Home बातम्या आणि घडामोडी स्वाइन फ्लू वास्तव आणि भीती
 
Information about Swine Flu in English language
Available Test Centers
Helplines
 
Print

स्वाइन फ्लू वास्तव आणि भीती

लोकसत्ता
१३ ऑगस्ट २००९

काही वर्षांपूर्वी ‘सार्स’ नावाच्या भुताने असेच जगाला पछाडले होते. ती दहशत किती फोल ठरली हे सर्वश्रुत आहेच. याचा अर्थ आपण बेसावध वा निष्काळजी राहावे, असे मुळीच नाही. दरवर्षी जागतिक स्तरावर ५-१५ टक्के लोकसंख्येला फ्लूची लागण होते. यात सर्दी, खोकला, ताप असे आजार आपोआप किंवा साध्या औषधांनी चार-पाच दिवसांत बरे होतात. तरीदेखील दरवर्षी तीन ते पाच लाख लोक अशा फ्लूशी संबंधित असणाऱ्या आजाराने दगावतात..जनतेला या ‘फ्लूसारखा फ्लू’ असणाऱ्या तापाने अक्षरश: भेदरवून टाकले आहे. वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे, नाही तर भय आणि मानसिक तणावामुळे उद्भवणाऱ्या व्याधींची वेगळी रांग लागेल.

स्वाइन फ्लूला जबाबदार असणाऱ्या ‘एच१एन१’ व्हायरसबद्दल व एकूणच या साथीबद्दल अपुरे ज्ञान, गैरसमज व अवास्तव भीती यामुळे लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. शिवाय स्वाइन फ्लूचे निदान झाले नाही तर आपल्या डोक्यावर खापर फुटेल या धास्तीने फॅमिली डॉक्टरसुद्धा लागलीच पुढील चाचणीसाठी पेशंटला शासकीय रुग्णालयात पाठवत आहेत. आधीच प्रचंड ताण असलेली रुग्णालये या लोंढय़ाने साफ कोलमडण्याच्या स्थितीत आहेत. महागाई आणि मंदीने पिचलेल्या जनतेला या ‘फ्लूसारखा फ्लू’ असणाऱ्या तापाने अक्षरश: भेदरवून टाकले आहे. वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर भय आणि मानसिक तणावामुळे उद्भवणाऱ्या व्याधींची वेगळी रांग लागेल.

दरवर्षी जागतिक स्तरावर ५-१५ टक्के लोकसंख्येला फ्लूची लागण होते. यात सर्दी, खोकला, ताप असे आजार आपोआप किंवा साध्या औषधांनी चार-पाच दिवसांत बरे होतात. तरीदेखील दरवर्षी तीन ते पाच लाख लोक अशा फ्लूशी संबंधित असणाऱ्या आजाराने दगावतात. यात सर्व वयोगटांचा समावेश असला तरी लहान मुले, वयस्कर माणसे किंवा जुनाट रोगांमुळे मानसिकदृष्टय़ा खचलेल्यांचा जास्त प्रमाणात समावेश आहे. ‘इनफ्ल्युएन्झा व्हायरस’च्या अनेक जाती आहेत. कधी कधी दोन किंवा अधिक जाती ‘स्ट्रेन्झ’ एकत्र येऊन तिसराच ‘व्हायरस’ निर्माण करतात. ‘म्युटण्ट स्ट्रेन्झ’ याची लक्षणे जरी सर्वसामान्य फ्लूसारखी असली तरी त्याचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होत असल्यामुळे महामारीचे स्वरूप धारण करू शकतो. १९१८ मधील ‘स्पॅनिश फ्लू’, १९५७ मधील ‘एशियन फ्लू’ किंवा १९६८-६९ मधील ‘हाँगकाँग फ्लू’ हे सगळे जागतिक महामारीच्या रांगेतील जवळपास सारखीच लक्षणे असणारे, ‘म्युटण्ट व्हायरस स्ट्रेन्झ’मुळे झालेले आजार आहेत. यातसुद्धा अनेक माणसे दगावली होती. या तापांवर नेमके औषध किंवा लस शोधून काढेपर्यंत त्यात आणखी ‘म्युटण्ट’ झालेली असतात व नवीन ‘स्ट्रेन्झ’मुळे उद्भवणाऱ्या आजारावर ती पुरेशी प्रभावी ठरत नाहीत. सध्याचा स्वाइन फ्लूचा ‘एच१एन१’ व्हायरससुद्धा एक ‘म्युटण्ट स्ट्रेन्झ’ आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या व्हायरसची लागण झालेल्यांची प्रचंड संख्या बघता, दगावणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण सुदैवाने अल्प आहे. याउलट मलेरिया, डेंग्यू, मॅनिंजायटिसने दगावणाऱ्यांची संख्या कितीतरी जास्त आहे. फरक एवढाच, की त्या रोगांवर आपल्याकडे ठोस उपाय आहेत शिवाय ओळखीच्या शत्रूची भीती अनोळखी शत्रूपेक्षा नक्कीच कमी असते. आतापर्यंत भारतात ८००-१००० हून अधिक व्यक्तींचे स्वाइन फ्लूचे निदान झालेले आहे. यात आतापर्यंत सुमारे २० माणसे दगावली आहेत. सुमारे एक दशलक्षाहून अधिक व्यक्तींमध्ये या आजाराची अगदी सौम्य प्रमाणात लक्षणे आढळून आली आहेत व काही दिवसांतच योग्य उपचारांनी ते पूर्ण बरे झाल्याची नोंद आहे. स्वाइन फ्लूचे निदान हे बरेचसे खर्चिक आणि वेळकाढू असल्यामुळे उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या किंवा रुग्णालयात दाखल होणाऱ्या व्यक्तींमध्येच चाचणी केली जाते. तात्पर्य हे, की आपल्याला स्वाइन फ्लू झाला आहे याची जाणीव व्हायच्या आधीच ९९ टक्के पेशंट बरे झालेले असतात. त्यामुळे या आजाराची भीती बाळगू नका, असे कळकळीने सांगावेसे वाटते. काही वर्षांपूर्वी ‘सार्स’ नावाच्या भुताने असेच जगाला पछाडले होते. ती दहशत किती फोल ठरली हे सर्वश्रुत आहेच.

याचा अर्थ आपण बेसावध वा निष्काळजी राहावे, असे मुळीच नाही. अमेरिका, युरोपसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये आर्थिक सुबत्ता आणि शिक्षणामुळे स्वच्छता, आहार आणि रोगप्रतिबंधात्मक उपायांवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे कुठलीही साथ व त्यामुळे होणारी जीवितहानी याकडे अतिशय गांभीर्याने पाहिले जाते. उलट भारतासारख्या प्रगतिशील पण गरीब राष्ट्रांमध्ये सार्वजनिक आरोग्य, सकस आहार व सामाजिक जाणिवेअभावी क्षय, मधुमेह, दमा व एचआयव्ही/एड्ससारखे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करणारे आजार असणाऱ्यांमध्ये कुठल्याही संसर्गाची लागण अधिक झपाटय़ाने व गंभीर स्वरूपाची होऊ शकते ‘स्वाइन फ्लू’ही याला अपवाद नाही. म्हणूनच कुठलीही साथ आली तर दुर्बळ रोगप्रतिकारक्षमता असणाऱ्यांनी अधिक सावध राहायला हवे. सामान्य माणसाने या आजाराला घाबरून जायचे काहीच कारण नाही. काही सूचना व खबरदारीचे उपाय घेतल्यास आपण ठणठणीत राहू शकतो. यावरचे उपाय नमूद करीत आहे.
  1. तापावर इलाज करा, नुसती लक्षणे दाबून टाकू नयेत. बरेचदा कामावर सुटी किंवा शाळेला दांडी नको म्हणून मुलांना तापाच्या औषधाचा डबल डोस देऊन शाळेला बळजबरीने पाठविणाऱ्या पालकांना सांगावेसे वाटते, की नुसत्या स्वाइन फ्लूमध्ये नव्हे तर कुठल्याही तापात मुलांना घरीच ठेवावे. ‘नॉर्मल’ वाटणाऱ्या फ्लूमध्येसुद्धा आपली प्रतिकारक्षमता खूप कमी होते व तिला पूर्ववत व्हायला किमान काही अवधी लागतो. कुठला व्हायरस रौद्र रूप धारण करील हे सुरुवातीलाच सांगणे कठीण. बरे झाल्यावर ‘साधाच’ ताप होता या भ्रमात आपण असतो. एका दिवसात बरे न वाटल्यास डॉक्टरकडून जरूर तपासून घ्यावे.
  2. सरसकट प्रत्येकाने मास्क घालण्याची आवश्यकता नाही. जंतुसंसर्गाचा प्रादुर्भाव इतरांना होऊ नये हा मास्क वापरण्याचा उद्देश. फ्लूचे व्हायरस हे हवेतून व श्वासातून पसरतात, त्यामुळे नुसते मास्क घालून उपयोग नाही. या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या नुसत्या सान्निध्यानेसुद्धा संसर्ग होऊ शकतो. सर्दी, खोकला, ताप असणाऱ्या व्यक्ती अथवा गरोदर स्त्रिया, तान्ही मुले, वयस्कर माणसे किंवा इतर मोठे आजार असणारे टीबी, एड्स, कॅन्सर यासारखे आजार असणाऱ्यांनी मास्कचा वापर जरूर करावा. इतरांनी नुसता स्वच्छ हातरुमाल बाळगला तरी चालेल.
  3. सर्व चाचण्या व उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कराव्यात.
    घसा दुखतो म्हणून सरकारी रुग्णालयात ‘स्वाइन फ्लू’च्या चाचणीसाठी रांग लावू नये. ‘एच१एन१’ व्हायरसची चाचणी खर्चिक असल्यामुळे उगाच त्याच्या फंदात पडू नये. शंका आल्यास तुमचे डॉक्टर जरूर त्याविषयी सल्ला देतील. ‘टॅमी फ्लू’ नावाचे औषध या आजारावर प्रभावी आहे, असे केवळ ऐकून त्याचा साठा बाळगू नये. ‘टॅमी फ्लू’ने स्वाइन फ्लू टाळता येत नाही. उलट अनावश्यक सेवन केल्यास खऱ्या-खुऱ्या स्वाइन फ्लूवर ते औषध निष्प्रभ ठरेल.
  4. पुरेशी विश्रांती, सकस व हलका आहार आणि योग्य उपचार यांना पर्याय नाही.
    साथीच्या आजारांमध्ये होमिओपॅथीचा प्रभावी उपचार नक्कीच आहे. जागतिक महामारींमध्ये होमिओपॅथी मोठय़ा प्रमाणात यशस्वी झाली आहे. रोगप्रतिबंधक अनेक औषधे होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत. गंभीर आजारांमध्येसुद्धा अ‍ॅलोपॅथिक औषधांबरोबर होमिओपॅथीची औषधे दिल्यास आजारावर लवकर नियंत्रण आणता येते.
डॉ. सुजाता नाईक,
MD (Homeo)
९८२०३५७७५३
dr.sujatanaik@yahoo.com

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.