Home Marathi Marathi - Announcement
 
 
Print

जाहीर आवाहन

"स्वाईन फ्लू" आजाराविषयी माहिती व घ्यावयाची काळजी
स्वाईन फ्लू हा आजार एच१एन१ या विषाणूमुळे होतो. सदर आजार हा साधा फ्लूसारखा असून त्यावर निश्चित उपचार आहेत.

प्रतिबंधक उपाय योजना म्हणून आपण हे अवश्य जाणून घेऊ या
स्वाईन फ्लू विषाणू काय आहे?
 • हा विषाणूमुळॆ होणारा आजार आहे.
 • याचा संसर्ग तीन फूटाच्या आतील संपर्कातील एका माणसापासून दुस-या माणसाला होतो.
लक्षणे
 • सौम्य ताप येणे, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, सर्दी, दोकेदुखी.
 • अतीसार व उलत्या होणे.
 • तीव्र श्वास घेण्यास त्रास होणे.
 • ताप ३ दिवसात न उतरणे व शुद्ध हरपणॆ.
हे करा
 • हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत.
 • भरपुर पाणी प्या.
 • पुरेशी झोप घ्या.
 • स्वाइन फ्लू रुग्नांपासुन किमान ३ फूट दुर रहा.
 • पौष्टिक आहार घ्या.
 • परदेशातून आल्यावर घरी किमान १० दिवस आराम घ्या.
 • लक्षणे आढळयास नायडू रुग्णालयात संपर्क साधा.
 • संपर्काच्या वेळी रुमाल व मास्क वापरावा.
हे टाळा
 • परदेशी जाणे शक्यतो टाळा.
 • गर्दीची ठीकाणं टाळा.
 • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा.
 • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळा.
आपण आजारी असाल तर
 • शकयतो कमी लोकांशी संपर्क ठेवून घरीच आराम घ्या.
 • पातळ पदार्थ मोठया प्रमाणात घ्या.

रोग निदान निश्चित झालेल्या निकट सहवासितास लक्षणे असल्यास त्वरीत खालील पत्यावर संपर्क साधा
पुणे, म.न.पा. - डॉ. नायडू रुग्णालय
८ केनडी रोड , आर.टी.ओ. ऑफ़िस व ली मेरीडीयन हॉटेलच्या दरम्यान,
पुणे-४११००१, महाराष्ट्र, भारत
दूरध्वनी: +९१ २० २६०५८२४३, +९१ २० २६०५८८४२ येथे स्वत: संपर्क साधावा.