Home Marathi Myths
 
 
Print

समज-गैरसमज

गैरसमज: स्वाइन फ्लू हानिकारक आहे.
समज: वैद्यकीय मतानुसार ’नाही’ जर तुम्ही आधीच कोणत्या आजाराने ग्रस्त नसाल तर. स्वाइन फ्लू हा सामान्य आजार असून तो सर्वसामान्य फ्लू सारखाच आहे. जर तुम्ही वेळीच योग्य उपचार घेतला आणि अतिदक्षता विभात राहून काळजी घेतली तर आजारातून तुम्ही बरे होऊ शकता असे विश्लेषण Dr. Syamasis Bandopadhyay, वैद्यकीय सल्लागार, Rheumatologist, अपोलो ग्लेनीग्लेस हॉस्पिटल, कोलकत्ता यांनी दिले. ते म्हणतात, "दिवसातून दोनदा Tamiflu हे रोग प्रतिकारक औषध पाच दिवस व्यवस्थित आरामासहित घ्यावे".

डॉ. हेमंत ठक्कर, जसलोक मधील वैद्याकीय सल्लागार, म्हणतात की स्वाइन फ़्लू हा प्लेग सारखा आजार नाही आहे, हयाच्यामध्ये मृत्युचे प्रमाण १ टक्क्यापेक्षा ही कमी आहे आणि कदाचित आपल्या देशात मलेरिया मुळे होणा-या मृत्युंचे प्रमाण १ टक्क्यापेक्षा जास्त असेल पण ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही तरी देखील स्वाइन फ़्लूचे वेळीच निदान व औषधोपचार करून आपण मृत्युचे प्रमाण करु शकतो.

गैरसमज:- मुंबई- मांटुगा हेल्थ क्लीनिकच्या डॉ. भारती देसाई म्हणतात, स्वाइन फ़्लू मुळे मृत्यु होतोच हा गैरसमज आहे. रुग्णाला उशीरा उपचार मिळाल्यामुळे किंवा प्रतिकार शक्ति कमी असल्यामुळे किंवा रुग्णाला मधुमेह किंवा इतर गंभीर आजारामुळे मृत्यु होऊ शकतो. तेंव्हा या आजारातून लवकर बरे होण्याकरिता रोगप्रतिकारक औषधांबरोबरच टँमी फ़्लू या गोळ्या देखील आवश्यक असतात. तसेच तुमची प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घ्यावा आणि आपल्या डॉक्टराच्या सल्लेनुसार मल्टी विटामिन च्या गोळ्या घ्याव्यात.

स्वाइन फ़्लू घातक आहे का?
स्वाइन फ़्लू बद्दल काळजीची गोष्ट अशी आहे की H1 N1 हा विषाणू लवकर पसरतो आणि एकाच वेळी अनेक लोकांना यांची लागण होऊ शकते आणि त्यांमुळे लोकामध्ये भीती निर्माण होऊ शकते. या भीतीमुळेच लोक तपासणी करण्याकरता तपासणी केंद्रावर जातात आणि तेथे कोणाला लागण झाली असेल तर त्यामुळे देखील संसर्ग वाढू शकतो म्हणून सर्दी, खोकला अशी काही लक्षणे आढळल्यास आधी आपल्या वैधकीय सल्लागाराचा सल्ला ध्यावा व त्यांनी सांगितले तरच तपासणी करावी असे ठक्कर म्हणतात.