Home Marathi Prevention
 
 
Print

स्वाइन फ्लू न होण्यासाठी घ्यावयाची काळजी

स्वाइन फ्लूमुळे कोणाला व कोणता धोका असू शकतो?
स्वाइन फ्लूचा तीव्र प्रभाव झालेल्या व्यक्तींना खाली नमूद केल्याप्रमाणे धोका असू शकतो.
 • मोठ्या कालावधीसाठी फूफ्फूसाचे विकार उद्भवतात. ज्यांनी गेल्या काही महिन्यांपासून दम्यावर उपचार घेतले आहेत अशांनाही हा त्रास उद्भवतो.
 • तीव्र हृदयविकार.
 • तीव्र मुत्रपिंडाचे विकार.
 • तीव्र यकृताचे विकार.
 • तीव्र न्युरॉलॉजिकल विकार.
एच १ एन १ पासून बचाव करण्यासाठी
 • खोकला किंवा शिंक आल्यास नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर ठेवावा. वापरून झाल्यावर टिश्यू पेपर फेकून द्यावा.
 • खोकला, शिंक आल्यावर नाक पुसून हात साबणाने स्वच्छ धुवा.
 • डोळे, नाक, तोंड यांना सतत हात लाऊ नये.
 • आजारी व्यक्तीच्या संपर्कात फार काळ राहू नये.
 • फ्लू सारखी लक्षणे दिसू लागल्यावर ७ दिवस किंवा लक्षणे गायब होण्याच्या २४ तासांपर्यंत घरातच थांबा. त्यामुळे अन्य लोकांना आजाराची लागण होणार नाही.
 • खबरदारी घेण्याच्यासंदर्भात आरोग्य खाते वेळोवेळी ज्या सूचना करेल किंवा आदेश देईल त्याचे पालन करा.
 • डॉक्टरांच्या मते मास्क पेक्षा स्वच्छ हातरुमालाचा वापर फायदेशीर ठरतो.

विशेष
जे सतत परदेशी प्रवास करतात अशांना लक्षणे जाणवल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी. सतत आजारी असणा-यांच्या संपर्कात वारंवार राहू नये.