Home Marathi Swine - Introduction
 
 
Print

स्वाईन फ्लू (H1N1)

स्वाईन फ्लू हा जुलै २००९ पासून मोठा चर्चेचा व चिंतेचा विषय बनला आहे. हा आजार मनुष्यामधे तिव्र श्वसनाच्या अनेक लक्षणांसह आढळतो. नुकत्याच मॅक्सिकोने केलेल्या परिक्षणात नवीन स्वाईन A (H1N1) विषाणूची नोंद करण्यात आली. आजवर याचा तीव्र प्रादुर्भाव मॅक्सिको शहरात झालेला आहे. अमेरिकेत मात्र याचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात झाला. योग्यवेळी योग्य ती खबरदारी न घेतल्यास त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो.

स्वाईन फ्लूचा विषाणू हवेत आठ तास जिवंत राहू शकतो. स्वाइन फ्लू विषाणू बाधित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने हवेत उडणा-या तुषारातील विषाणू धूलिकणावेष्टीत स्वरुपात जिवंत राहतात. तसेच हे विषाणू खुर्ची, टेबलसारख्या ठिकाणीही जिवंत राहतात. या विषाणूंचा नाक, डोळे, तोंड यासारख्या घ्राणेंद्रियांशी संपर्क झाल्यास विषाणूंचे संक्रमण होते. डुकराचे मटन खाणे व स्वाइन फ्लू यात काहीच संबंध नाही.

स्वाइनफ्लू हा संसर्गजन्य आजार असून त्याच्या विषाणूंचे तीव्र स्वरुप म्हणजे टॉमी फ्लू होय. स्वाइन फ्लूच्या विषाणूंची लागण झाल्यास १ ते ७ दिवसांतच त्याची लक्षणे दिसू लागतात. स्वाइन फ्लूची लागण झाल्यापासूनच ४८ तासांत त्या रुग्णाला टॉमी फ्लूची औषधे द्यावी लागतात.

फ्लूच्या विषाणूंच्या लक्षणांच्या वर्णनावरुनच स्वाइन फ्लूच्या A (H1N1) विषाणूचे निदान होते. स्वाइन फ्लूवर सर्वसाधारण फ्लूचेच उपचार केले जातात. डॉक्टरांच्या सल्ल्यावरुनच प्रतिबंधक औषधे दिली जातात. आजाराचे स्वरुप अधिक तीव्र असेल तर त्याला स्वतंत्र देखरेखीतही ठेवले जाते.

स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे व संसर्गजन्य रोगांच्या सहा पातळ्या असतात
  • जनावरापासून जनावराला संसर्ग.
  • जनावरापासून माणसाला संसर्ग.
  • जनावरापासून माणूस व माणसापासून दुसरा माणूस.
  • माणसाच्या समूहातून दुस-या समूहाला संसर्ग.
  • विस्तारित भागातील मोठ्या समूहांना संसर्ग.
  • सर्व समाजात विषाणूंचा संसर्ग.

महत्वाचे संपर्क
डॉ. ए. सी. मिश्रा
संचालक, नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हिरॉलॉजी
दुरध्वनी क्रमांक: +९१ २० २६१२४३८६

डॉ. एम. एस. चंद्रा
उप संचालक, नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हिरॉलॉजी
दुरध्वनी क्रमांक: +९१ २० २६००६२४७
टेलिफोन: +९१ २० २६००६२४७

स्वाइन फ्लूसाठी काही महत्वाच्या साईट्स